logo

कृपया पत्रकारांच्या हितासाठी प्रकाशनार्थ मतदानादिवशी वृत्तांकन करणाऱ्या देशभरातील प्रसार माध्यमातील छायाचित्र पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्टचे प्रतिनिधी,व्हिडिओ जर्नालिस्टस यांना टपाली मतदानाची सुविधा द्यावी - मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया

कृपया पत्रकारांच्या हितासाठी प्रकाशनार्थ

मतदानादिवशी वृत्तांकन करणाऱ्या देशभरातील प्रसार माध्यमातील छायाचित्र पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्टचे प्रतिनिधी, व्हिडिओ जर्नालिस्टस यांना टपाली मतदानाची सुविधा द्यावी - मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया

मुकेश श्रीकृष्ण धावडे
दिनांक.14 प्रतिनिधी
राजीव कुमार मुख्य निवडणूक अधिकारी,भारत
यांना एस चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी ,महाराष्ट्र यांचे द्वारा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन देण्यात आले!

मतदानादिवशी बहुतांशी पत्रकार विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्ट माध्यम प्रतिनिधी मतदान वृत्तांकनासाठी, नेत्यांंच्या मतदान कव्हरेजसाठी जातात. अशांचे मतदान राहून जाते. आणि म्हणूनच आमची विनंती अशी की, शासकीय कर्मचारी व वयस्क मतदारांप्रमाणे अशा पत्रकारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने लागू केली तर, ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत. (उदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कॕमेरामन प्रतिनिधी सिंधुदुर्गमध्ये कव्हरेजला गेल्यास इथे मतदान चुकू शकते.) आमच्या विनंतीचा व मतदानाच्या हक्काचा विचार करून अचुक निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.

2
354 views
1 comment  
  • Mukesh Shrikrishna Dhawade

    👍👍👍👌👌👌👌